मुंबई चा आहे म्हणे, आणि त्याचा मोठा 2 बी एच के फ्लॅट आहे, पॅकेज पण छान आहे बरं का बस्स इथून हा शहरातील जावई चा थाट सुरू होतो.
माफ करा मोठं शहर म्हणून पहिलं नावं मुंबई आणि दुसरं नाव पुणे हे घेण्यात येतं आणि मग यातूनच अपेक्षा सुरू होतात..
वरील संदर्भातून समजले असेल आज माझा ब्लॉग हा जावई आणि शहरातील दिशा ठरवणारी एक तडजोड की समाधान कारक एक गोष्ट आहे, यावर माझा आजचा ब्लॉग आहे.
इच्छा आणि इच्छाशक्ती यांमध्ये खुप साम्य आहे असं काही नाही, इच्छा म्हणजे माझा जावई मोठ्या शहरातील असावा आणि इच्छाशक्ती म्हणजे माझा जावई हा मोठ्या शहरातीलचं असावा हा अट्टहास.
गावखेड्यातून शिक्षण घेण्यासाठी आलेली काही मुलं कधी या मोठ्याल्या शहरात हरवून जातात समजतच नाही पण, आपल्या गावाचा विकास, प्रगती ही कधी सुधारतच नाही. यात आपला दोष नाही किंव्हा असेलच असं ही आपण म्हणू शकत नाही. पण, मुलाच्या आई वडिलांनी स्वप्न पहावे आणि गावातील मुलाने ते सर्वतोपरी पूर्ण करावे. आणि हे करता करता कधी 28/30 वयापर्यंत येतो आणि मग सुरू होतो लग्नवेधी प्रवास हो लग्नवेधीच कारण शहरांचा विकास झाला मोठया गोष्टी फक्त शहरात होऊ लागल्या आणि गाव आणि गावातील शहर ओस पडू लागली.
लग्नवेधी होताना मुलगा मुबंई-पुणे चा पाहिजे हा अट्टाहास घेऊन मुलीचे आई वडील जेव्हा हे बोलतात तेव्हा एका गावातील मुलाचे मन धस्स होते. सोबत
आठ ते दहा लाख पॅकेज किंव्हा त्या पुढे. सामान्य घरातील मुलं ही मेहनत करून आई वडिलांची स्वप्न पूर्ण करतात. छान नोकरी लागते, हळूहळू फ्लॅट घेतात आणि कर्ज हा एक पैलू आपला सोबती होऊन जातो.
25-30 हजार नोकरी असलेला मुलगा हा फ्लॅट चे हप्ते देत देत अजून काही आपण नोकरी व्यतिरिक्त आपले छंद जपून अथवा छंद जपले तर, त्यातून काही आपल्याला पैसे मिळतील का.? याचा पर्याय शोधू लागतो. ही त्यांची मेहनत त्यांचे कष्ट एक आई वडील सोडले तर कोणीच बघत नाही. फक्त बघितले जाते ते त्यांचे पॅकेज आणि त्यांच्या कडे असलेला फ्लॅट कार आणि बरेच काही...
संस्कृती आणि संस्कार अहो हे कदाचित आपण पॅकेज-फ्लॅट-आणि कार या यशस्वी गोष्टी नंतर याकडे पाहतो. पण, या तीन गोष्टी मिळाल्या की संस्कृती
आणि संस्कार म्हणजे आई वडील नकोत मुलगा एकटाच पाहिजे. अहो एकत्र कुटूंबाचा आनंद म्हणजे स्वर्गचं.!
मला मोठया शहरातील जावई पाहिजे आणि मग असं म्हणत आपण एका ठराविक वयापर्यंत येऊन पोहचतो
ते 35/40.. इथं मात्र मग आपल्या अपेक्षा चा बांध तुटतो कदाचित.. आणि मग मिळेल तसं नशीब मानून आपण मुलींचे लग्न लावून देतो.
मी अनुभवाने मोठा नाही की वयाने पण प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहत आहे. सर्वच जावई मुंबई-पुणे मधील असावेत तर मग गावातील मुलांनी काय करायचे.?
गावं फक्त निसर्गाने नटलेला पाहिजे पण गावांतील जावई मुळीच नको, हा गावांतला चालेल पण,
मुबंई-पुणे या शहरात नोकरी फ्लॅट पाहिजे. स्वतःच्या आई-वडिलांना सोडून मुलगा आणि सून एकत्र नोकरी पॅकेज साठी मोठ्या शहरात जातात, आणि आई वडील मुलांची प्रत्येक पारंपरिक सण असतील तेव्हा आतुरतेने वाट पाहत असतात.
सगळ्या सुविधा आहेत. पण, मोठ्या शहरातील रेलचेल नाही, म्हणून गावातील मुलं नकोत. हो नकोच आणि नकोतच.
आई वडिलांनी त्यांची गरज ओळखून आपल्या मुलाला शिकवले असते. चांगले संस्कार दिले असतात. पण, गावातील आई वडिलांची प्रेम माया म्हणून कदाचित काही मुलं शहरात किंव्हा कुठं परदेशी गेली नसावीत अथवा आवडता छंद जपून नोकरी करून आपल्या गावातच स्थायिक झाली असावीत.
आदरणीय मुलींचे आई-वडील आपल्या मुली प्रति प्रेम आणि जिव्हाळा तसेच तिचा संसार छान व्हावा मुलगा छान मिळावा ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असतेच असलीच पाहिजे. पण, माफ करा प्रत्येक मुलगा मोठ्या शहरातीलचं असावा किंव्हा मोठं पॅकेज असेल तरचं आपली मुलगी सुखी राहू शकते हा कदाचित गैरसमज आहे. शेती करणारा मुलगा पण तुमच्या मुलीला आनंदी ठेवू शकतो आणि नोकरी करणारा देखील पण त्याचं मोजमाप असं करू नका की पॅकेज लाखात आहे का.?
संधी द्या नक्कीचं सोनं होईल.!
सर्व लेख शहरातील जावई आणि गावातील जावई यांवर लिहिला आहे. कोणत्याही स्थळाला गावाला अथवा शहराला कोणालाही कमी लेखण्याचा उद्देश नाही.
धन्यवाद.!
🖋️लेखणी : गौरव अनिल चिटणीस.