ओळख नवी एका वळणावर येऊन ठेपली..
आपल्या देशात एक नवीनच पाहुणा आला आहे, आश्चर्य.??? काय त्यात हो कोरोना पाहुणाच आहे.
जीवघेणा आजार पाहुणा वाटतो तरी कसा.???
असा विचार करत असाल तर थोडं थांबा,
पहा स्वतःकडे बघितलं त का.??? कितीसा वेळ देता होता हो तुम्ही स्वतःला.? आपल्या कुटूंबातील व्यक्तींना.?
कधी थांबला होता का स्वतःसाठी.? कधी विचार केला होता का स्वतः साठी.? नाही ना.?
मग बघा एक संधी मिळाली आहे, हो संधीचं त्याचं वलय कसं निर्माण करायचे हे शिकवणारे हे वळण.
रोग आहे खरा मोठा, या जीवघेणा रोग आला तरी कुठून आणि आला तर आला वर्षागाठी आपला च सवंगडी होऊनच बसला आहे रे बाबा.
आपला सवंगडी एक दिवस जाईल हो कायमचा पण जाताजाता आपल्याला आपली अनमोल व्यक्ती यांना आपल्या पासून दूर घेऊन अनंतात विलीन झाले, तर काही निवडक क्षण आपल्यासाठी ठेऊन जात आहेत.
लॉकडाऊन झाले आणि आयुष्यचं थांबले, आणि आम्ही माणसं जोडायला शिकलो, गावाकडील लोक माणसं जोडून असतात की आणि आम्ही कुठे परकं वागतो,.?परकं अहो इथं माणसं काम असेल तरच गोड नाही तर "मी" अहंकार च्या शोधात असचं काहीसं वळणं.
मित्रांनो माणसं जोडायला शिका, कोरोना ने काही अनमोल व्यक्ती हिरावून घेतल्या, पण ...
मी, अहंकार, पैसा, पसिद्धी, नाव, मोठेपणा या खुप कवडीमोल गोष्टी आहेत हे ही तितकंच दाखवून दिले, नाती जोडली प्रेम व्यक्त केले, एकमेकांच्या सहवासात राहिला, एकमेकांना जोडून आपल्याच माणसांना मोठे होण्यास मदत केली तर तुम्ही एक सुखी आनंदी जग जगलात हे तुम्हीचं अभिमानाने सांगाल...
गौरव अनिल चिटणीस.
"काळजी घ्या,सुरक्षित रहा"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा