मी आज एक नवीन नोकरी साठी विचार करत होतो, माझं महाविद्यालय मधील वर्ष आणि माझी मिळालेली पदवी यांचा विचार करता, आता मला असं वाटत आहे, कदाचित अनुभव म्हणून तरी मी एखादी नवीन नोकरी करू का.???
असाच मनात विचार येऊन गेला, आणि मी नोकरी च्या शोधात निघालो...
पहिलीच नोकरी आणि पहिलाच काय तो अनुभव अशी एक चित्र-विचित्र अवस्था, आणि आज मुलाखत देऊन मी नेहमी प्रमाणे हताश होऊन घरी आलो. पण मी, स्वतःला समजवत नवीन उमेद घेऊन एका जिद्दीने परत नोकरीच्या शोधात निघालो.
मुलाखतीचा इतका छान अनुभव मला आला होता की, मी आता चट की पट उत्तर देत होतो आणि....
झालं एकदाचं माझं नोकरीचं काम, आणि मी खुप आनंदी होऊन घरी आलो आणि सर्व अनुभव कुटूंबासोबत व्यक्त केला आणि..
नोकरी लागली हा तर आनंद होताच पण आता काम करण्याची जबाबदारी ही वाढली, नोकरी करताना चांगले-वाईट अनुभव येऊ लागले पण नोकरी म्हणलं की या छोट्या गोष्टींना सामोरे जावेच लागणार यांची जाणीव होऊ लागली, आणि मी प्रामाणिक पणे काम करायला सुरुवात केली.
असेच कित्येक वर्षे निघून गेली, छान अनुभवातून मी शिकत राहिलो, माझी छान पैकी प्रगती ही होऊ लागली होती. असेच कित्येक वर्षे निघून गेली. पण...,
कदाचित निष्ठा पणाला लावली आणि,
नोकरी गेली असं का.???
आपण आपल्या कंपनी-नोकरी वर आणि चांगल्या-वाईट सर्व गोष्टी मध्ये प्रामाणिक पणे एकनिष्ठ काम करून आपले कर्तृत्व सिद्ध करतो, आणि काही क्षणातच आपली नोकरी, आपली निष्ठा, आपला प्रामाणिकपणा सर्व काही एका क्षणात निघून गेले...
शेवटी...
पुन्हा एक नवीन अनुभव, पुन्हा एक नवीन नोकरी, तीच नवीन जिद्द, नवीन उमेद, आणि माझा नोकरी विषयी असलेला प्रामाणिकपणा...
कोरोना अशा महामारीत गेलेली नोकरी हा एक अनुभव आहे, आपल्या कंपनी विषयी असा काही गैरसमज करून घेऊ नका, कदाचित आज आपल्या कंपनी ने आपल्याला कामावरून कमी केले असेल पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रामाणिक नाही, एकनिष्ठ नाही
आज जगावर आलेली कोरोना सारखी महामारी पाहता आज प्रत्येक व्यवसाय-नोकरी सर्व काही विस्कळीत झाले आहे, काळाजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल, आणि हे ही दिवस जातील...
अनुभव ला सोबत घेऊन, जिद्द-प्रामाणिकता तसेच चांगले-वाईट विचार समोर ठेऊन नवीन उमेदीकडे वाटचाल करूयात...
गौरव अनिल चिटणीस.
"काळजी घ्या,सुरक्षित रहा"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा