बुधवार, १ जुलै, २०२०

मन सुन्न करणाऱ्या व्यक्तिरेखा...

मनातील विचार नकारात्मक ने व्यापले आहेत का.?

आज काल काही किरकोळ कारणामुळे मन सु-शांत होते तेव्हा, आजची व्यक्तीरेखा खुप बदली आहे.

काहीच सकारात्मक दृष्टिकोन नाही, फक्त आपल्याच विचारात मग्न आणि काही झालेच तर फक्त मन सु-शांत करून देणाऱ्या बातम्या...

निराशा यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे आपला जीव देणे आणि हाच खुपच स्वस्त झाला आहे बर का.,

हो., कारण रोज ऎकत आहे मन सुन्न करून देणारी बातमी, आणि धस्स...

आज काल सभोवताली जीव देणं म्हणजे एक अर्थी स्पर्धाच चालू झाली आहे बर का.

मला कमी मार्क पडले दे जीव,
कोण थोडंस काही बोल दे जीव,
काही पटलं नाही दे जीव,
मनासारखं झाले नाही दे जीव,
मला प्रियसी-प्रियकर ने फसवले दे जीव,
मला कोणती वस्तू नाही मिळाली दे जीव,
 
अरे.??? इतका स्वस्त झाला का रे तुमचा जीव.???
आणि का असल्या फालतू कारणासाठी.???

तुम्ही लहान मुलं किंव्हा अगदी माझा एवढी सुद्धा, काय म्हणजे तुम्ही काय विचार करता.??? अहो असले फालतू विचार करूनच वाट लागली आहे आपल्या देशाची. 

हो, कारण चांगले विचार सांगायला कोणी नाही, बालसंस्कार तर खुप मागे सोडले आम्ही, आम्ही फक्त अरे ला कारे करतो आणि जीव पणाला लावून 
आई-वडिलांचे मन सुन्न करून जातो.

असल्या फालतू गोष्टी करण्यापेक्षा स्वतः अस काही तरी करा जेव्हा तुम्ही मागे बघाल तेव्हा अरे आपलं चुकलं आपण चुकीच्या मार्गाने जात तर होतो पण वेळीच आवर घातला आणि आज माझं आयुष्य एक यशस्वी पणे स्वतःच्या पायावर छान उभे आहे का.? असा विचार करा.

आयुष्य जगताना जास्त काही लागत नाही, लागतो तो फक्त आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन.

मला जमतच नाही,जमणारच नाही अरे, प्रयत्न तरी करा, आत्मविश्वास द्या स्वतःला जमेल, मी करेन.

जिथं तुम्हाला प्रश्नचिन्ह उभे राहते तिथे तुम्ही मार्ग काढायला का शिकत नाही.? जिथं चुकाल तिथं माफी मागायला का शिकत नाही.? माफी मागितल्याने कोण लहान-मोठे होत नसते, आपली जिथं चूक झाली तिथं माफी मागायची तयारी ठेवा, फक्त अहंकार मोठा असून चालत नाही तर मन ही मोठं लागते, प्रत्येक गोष्टी मध्ये कधी लहान तर कधी मोठं होऊन समजून घ्या.

कारण कोणतेही असुदेत, स्वतः ला सर्वांसमोर सिद्ध करण्याची तयारी ठेवा, तुम्ही प्रयत्नशील रहा, सकारात्मक बुद्धीचा उपयोग करा, आयुष्यात 
चढ-उतार येत असतात, चांगले-वाईट अनुभव ही येत असतात पण मार्ग कोणता निवडायला पाहिजे हा निर्णय जरी आपल्यावर असला तरी पण मी जीव देऊन प्रश्न सुटणार नाही तर तुम्ही पळपुटे आहात हे सिद्धच करत आहात.

चांगले-वाईट अनुभव हे प्रत्येक व्यक्तीच्या च आयुष्यात येत असतात पण जीव च देणं हा उपाय निवडून तुमचं मोलाचं आयुष्य संपवू नका.

आयुष्यभर अनुभव घ्या, आयुष्यात कधीतरी हार पण मानायला शिका, प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे असं ही काही नाही. आणि प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यात आनंदचं असला पाहिजे असं ही काही नाही, पण...

परिस्थिती कशी ही असली तरी पण नेहमी सकारात्मक रहा, कोणतीच गोष्ट अवघड नसते पण, आधी प्रयत्न तर करा, मला जमेल का नाही माहीत नाही पण,..

जमले तर जिंकलो आणि नाही जमले तर हरलो असं नाही तर एक नवीन अनुभव मिळाला हाच माझा सोबती...

गौरव अनिल चिटणीस
"काळजी घ्या,सुरक्षित रहा"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आज " गुरू पौर्णिमा" म्हणूनच काही विशेष अनुभव सांगताना माझ्या आज वरच्या प्रत्येक "गुरू" ना मी नमन करतो. बालपण आणि आई...