आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळण पार करत असतो, आणि अचानक वळण हे खड्यात रुतलेल्या चाकासारखे रुतून राहते.
आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक अशा आवडत्या मित्र,प्रियजन,सहकारी यांच्याकडून एक मोलाचा सल्ला घेतचं असतो की एक मनांत विचार घोगावत राहतात का बरं आपण यांच्याशी चर्चा करत आहोत यातील काही जण तर आपली खिल्ली उडवत असतील नाही का.? असं म्हणून मी मात्र गप्पचं राहिलो.
उगाचंच एक वळण आयुष्यात येते आणि आपल्यातला चांगलेपणा विश्वासप्रिय गोष्ट हिरावून चालली आहे की, काय.? असा भास होतो. पण, आपल्या आयुष्यात असे देखील होते की, अनुभव नावाचं एक खात्रीपूर्वक औषध आपल्या जखमेवर एक संजीवनीचं हळुवारपणे फुकर मारून आपल्या चुकीची आपल्या प्रत्येक गोष्टीची अनुभूती करून देते.
आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यात एक आई नावाचं कोडं असते. हो कोडं.! असं का बरं.?
कारण आपल्या आयुष्यात आपल्याला मोलाचा सल्ला आणि अनुभवांची फुकर ही फक्त आपली आईचं देऊ शकते. कारण, तिने नऊ महिने आपल्या जीवाला पोटात वाढून आपल्या जीवाला दिलेला असतो तो जन्म आणि ती एक आईचं असते की प्रत्येक वळणार आपल्या जीवाला काही कमी पडणार नाही. आपल्या जीवाला कधी काही खुपणार नाही, यांसाठी ती अतोनात प्रयत्न करत असते आणि मी आपण आयुष्यात एक चूक झाली की लगेच कोलमडून पडतो, हो असचं काहीसं माझ्या बाबतीत देखील झालं आणि आईच्या कुशीत मला माझं अस्तित्व जाणवलं.
अरे मी हाच मुलगा आहे का.? जो कधी हार मानत नाही, आणि सतत म्हणतो की विश्वास पाहिजे स्वतःवर, करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. हो नक्कीच हा विश्वास आहे की, आपल्या मनांची इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो.
एक पर्व आणि नवं वळण...
✒️ लेखणी : गौरव अनिल चिटणीस.
Nice
उत्तर द्याहटवामस्त..
उत्तर द्याहटवा